मुकुटबन येथे सोमवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

झरी तालुक्यातील रुग्णांना घेता येणार लाभ.... अधिक माहितीसाठी संपर्क: 9423653209

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. सदर शिबिर हे सोमवारी दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 वाजता होणार आहे. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज बडोदेकर, डॉ. एस जमिल अहमद, डॉ. एस नदीम अहमद हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात प्रत्येक रुग्णांची बीपी, एसीजी व सुगर तपासणी केली जाणार आहे. यासाठी 50 रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. सदर शिबिर हे मुकुटबन येथील प्रदीप मेडिकल येथे होणार आहे. 

Podar School 2025

सदर कॅम्पमध्ये मधूमेह, हृदयरोग, यकृतरोग, दमा, मुत्रपिंड, लकवा, सर्दी-खोकला, ऍसिडिटी, संधीवात, डोकेदुखी इद्यादी रोगांचे तपासणी करून रोगांचे निदान केले जाणार आहे. सदर शिबिर हे स्टेट बँक जवळील प्रदीप मेडीकल येथे होणार आहे. विदर्भातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट व कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. रोहीत चोरडिया, MBBS, MD (Medicine) हे भेट देऊन रुग्णांना आरोग्य सेवा देणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर शिबिरासाठी पूर्वनोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. 9423653209 या क्रमांकावर रुग्णांना नोंदणी करता येणार आहे. शिवाय ऑन स्पॉट नोंदणी रुग्णांना करता येणार आहे. या आरोग्य शिबिराचा मुकुटबन तसेच झरी तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.