शिंदोला येथे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या महिलांचा सत्कार

महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कौटुंबीक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक क्षेत्रातही धडाडीने कार्य करणा-या महिलांचा शिंदोला येथे सत्कार करण्यात आला. रत्नकला मंगल कार्यालय येथे मंगळवारी दिनांक 15 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका एकविरा महिला अर्बन बँकेच्या अध्यक्ष किरण देरकर होत्या. तर अलका विठ्ठल बोन्डे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी कुंदा देहारकर, वंदना भगत, संगीता कामटकर, कमला खंडाळकर, छाया धुर्वे, बेबी पिंपळकर, लता साळवे यांचा सामाजिक क्षेत्रातील कार्याबाबत जाहीर सत्कार करण्यात आला.

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात झाली. आजची महिला ही केवळ चूल व मुल पुरती मर्यादीत न राहता ती स्वत:च्या पायावर हिंमतीवर उभी आहे. मात्र हीच परिस्थिती सर्वच महिलांची नाही. त्यामुळे सर्व समाजाच्या महिलांना मुख्य प्रवाहात आणणे हेच अंतिम ध्येय असल्याचा मानस किरण देरकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला. महिला जो पर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तो पर्यंत महिलांची प्रगती होणे अशक्य आहे. असे मनोगत अलका बोंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

यावेळी मंचावर मिनाक्षी मोहिते, शारदा बोबडे, पार्वता बोबडे, सुलोचना गिरी, रुपलता निखाडे, अर्चना किनाके, रुपाली बोबडे, अर्चना ठाकरे, मनीषा हेपट, मनीषा पिदूरकर, कलावती पंधरे, ज्योती कोल्हे, वैशाली कुंडकर, शबाना शेख, रंजू शैख, सोनम मडावी, सुचिता जोगी, कलावती मोहितकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन मीना हेपट, रुपाली बोबडे, जया गिरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेखा लुकेश्वर बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा धानकी, वानिता निखाडे, विद्या बोन्डे, मंदा तुराणकर, उज्वला बोबडे, वैजू झीलपे, बेबी चटप, कुसुम ताजणे, निर्मला हेलवडे, मंदा हेलवडे, चंद्रकला काळे, पंचफुला बोन्डे, सुनीता बोबडे, छाया धगडी, मंदा पाचभाई, कल्पना बोबडे, कुसुम पिंपलशेडे, सीमा बोबडे, अल्काताई दानव, शारदा ताजने, विजया वासुकर, बाजाबाई मोहितकर, गीता सिडाम, सुषमा सिडाम, संगीता इचोडकर, ललिता सिडाम यांच्यासह गावातील तसेच बचतगटाच्या महिलांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिंदोला व परिसरातील महिला उपस्थित होत्या. 

हे देखील वाचा:

घोड दौड स्पर्धेत डॉ. संकेत अलोणे यांना रौप्यपदक

वणीत शेतकरी मंदिरात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न

Comments are closed.