वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणासाठी ओबीसी परिषदेचे निवेदन
विवेक तोटावार, वणीः केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणात ओबीसींसाठी आरक्षण कमी केल्याचे निवेदन ओबीसी परिषदेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. ओबीसी परिषदेच्या म्हणण्यानुसार मंडळ आयोग व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसींना 27 टक्के, एस. सीं.ना 15 टक्के व एस. टी. 7.5 टक्के असे आरक्षण आहे. परंतु आरक्षणाच्या सर्व सर्व निकष व सूचना तसेच आदेशांना डावलून केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त 74 जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्यात. ओबीसींच्या वाट्याच्या 928 जागांसह एकूण 2811 जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आल्याचे ओबीसी परिषदेचे म्हणणे आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांच्या हक्काचे 27 टक्के आरक्षण देण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी प्रवीण खानझोडे, अखील सातोकर, सुधाकर गारघाटे, विवेक ठाकरे, अमोल टोंगे, कृष्णा ढुमणे, मंगेश रासेकर, दिलीप भोयर, संजय चिंचोळकर, प्रदीप बोरकुटे, सिद्दीक रंगरेज, संदीप रिंगोले, अशोक अक्कलवार, अजय धोबे हे यावेळी उपस्थित होते.