ज्योतिबा पोटे, मारेगाव: येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या ना वैद्यकीय अधीक्षक आहे ना वैद्यकीय अधिकारी त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सध्या शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या भरोश्यावर रुग्णालयाचा कारभार कसातरी सुरु आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी यांनी रुग्णालयाला दोनदा भेट दिली. मात्र त्याने देखील कोणताही फरक पडलेला नाही. या रुग्णालयात डॉक्टर देण्यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने लोकप्रतिनिधींचे अक्षम दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मारेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रुग्णालयाचा कारभार पूर्णतः ढेपळला असल्याचे दिसून येत आहे. सध्यां पावसाळा सुरू झाला आहे. रोगराई पसरण्याचा हा काळ आहे. अशा स्थितीत या रुग्णालयाचा कारभार शालेय तपासणी पथकातील डॉक्टर बघत आहे. एकीकडे शासनाला शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी अहवाल हवा आहे, तर दुसरीकडे शालेय तपासणी पथकातील डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करीत आहे. परिणामी ग्रामीण भागातील शाळा आरोग्य तपासणी पासून वंचित आहेत.
शालेय तपासणी सोडून या डॉक्टरांना ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. मारेगाव ग्रामीण रुग्णालयात शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी यांनी दोनदा भेट देऊन सुद्धा या रुग्णालयात डॉक्टर देण्यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली झाल्या नाही, तर येथील लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळेच मारेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची वानवा आहे. केवळ स्थानिक बैठका घेऊन पोकळ आश्वासनाची खैरात जनतेला मिळत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाने लक्ष पुरवून येथील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णालयात डॉक्टरांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.