दुर्भा ग्रामपंचायतमध्ये कोरोना दक्षता समितीची बैठक 

सरपंच सतीश नाकले यांचा गाव कोरोनामुक्त करण्याचा संकल्प

0
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील दुर्भा येथे 11 कोरोना पोजीटीव्ह रुग्ण आढल्याने गावात भीतीचे वातावरण झाले. गावातील इतर जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता पोजीटीव्ह रुग्णांना सर्व सोय सुविधा उपलब्ध करून गावातील एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ देणार नाही असा संकल्प केला आहे.
याच अनुषंगाने 14 मे रोज सकाळी 10 वा ग्रामपंचायत मध्ये संमधीत अधिकारी यांना पाचारण करून बैठक घेण्यात आली. बैठकीत गावातील सर्व लोकांना लसीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच शासनाने टाकलेले निर्बंध व नियम पाळणे.सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, मास्क लावणे,सैनिटायजर ने वेळोवेळी हात साफ करीत राहणे व इतर बॉबीवर चर्चा करण्यात आली.
युवा व तडफदार  सरपंच सतिश नाकले यांनी ग्रामवासीयाकरिता पूर्ण प्रयत्न करीन व गाव कोरोनामुक्त करणार असा संकल केला आहे. बैठकीत  गटविकास अधिकारी भागवत रेजीवाड, सरपंच सतीश नाकले, सचिव प्रशांत डोनेकर, उपसरपंच सुरेश नल्लावार, अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 

हे देखील वाचा: 

महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील

नितीन गडकरींतर्फे 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.