सहकार क्षेत्र ही विकासाची चावी: देविदास काळे
मुकुटबन येथे पार पडला वसंत जिनिंगचा सभासद मेळावा
सुशील ओझा, झरी: सहकार क्षेत्र ही विकासाची चावी असून हे क्षेत्र जेवढे वाढेल तेवढा परिसरात विकास होतो. लोकांना रोजगार ही उपलब्ध होतो. त्यामुळे सहकार क्षेत्र परिसरात अधिकाधिक रुजणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वसंत जिनिंगचे अध्यक्ष देविदास काळे यांनी केले. दी वसंत को. ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग ऍन्ड फॅक्टरीचा रविवारी 5 सप्टेंबरला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभासद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत जिनिंगचे अध्यक्ष देविदास काळे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की जेव्हा मी संस्थेचा सदस्य झालो होतो तेव्हा कर्मचा-यांचे पगार निघू शकेल इतकीही संस्थेची परिस्थिती नव्हती. मात्र सूत्रे हातात घेताच संस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूर केली नाही तर संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तारही केला. आज परिसरात परिसरात वसंत जिनिंगचे 5 ठिकाणी युनिट आहे. वणी आणि मारेगावमध्ये मंगल कार्यालय व गेस्ट हाऊसच्या माध्यमातून यशस्वीरित्या काम सुरू आहे. असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात वामनराव कासावार यांनी इंदिरा सुतगिरणीच्या विषय उचलून धरला. सुतगिरणीच्या माध्यमातून परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. मात्र चुकीचे लोक निवडून आल्याने एक चांगली सहकारी संस्था डबघाईला आली. जशी जीएस ऑईल मिलची परिस्थिती झाली, तशीच आज सुतगिरणीची परिस्थिती झाली असल्याचे त्यांनी म्हटले. तर टीकाराम कोंगरे यांनी सहकार हे ग्रामीण पत क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात संस्थेचा विस्तार व्हावा असे मनोगत व्यक्त करीत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत गोहोकर, राजू येल्टीवार, बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, आशिष खुलसंगे, शुभांगी बेलखेडे, संगिता नाकले यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद, शेतकरी बांधव उपस्थित होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.