राजकीय दबावामुळे कंपनीने उपोषणकर्त्यांना सोडले वाऱ्यावर

एका लोकप्रतिनिधी विरोधात तरुणांचा संताप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या सुरू झाल्या आहे तर अनेक कंपनी येणार आहे. मुकुटबन येथे खासगी सिमेंट कंपणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही महिन्यात पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे. मुकुटबन येथील बीएस इस्पात कोळसा व सिमेंट कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्या करिता आक्रमक आमरण उपोषण करण्यात आले.

उपोषणाला सामाजिक संघटना,ग्रामपंचायत, पत्रकार, कामगार संघटना, व विविध राजकीय पक्षापासून तर हजारो तरुण युवकांनी पाठिंबा होता व त्याच अनुषंगाने उपोषणकर्त्यांच्या तीन टप्यात 40 तरुण घेण्याचे व उर्वरित 248 तरुण टप्याटप्याने घेणार असल्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, ठाणेदार व शेकडो तरुण व गावकऱ्यासमोर लेखी आश्वासन कंपनीने दिले होते.

उपोषण सुटताच मुकुटबन भेंडाळा व अर्धवन ग्रामपंचायत ने गावात घरोघरी फिरून यादी तयार करून एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून बीएस इस्पात कंवणीत देऊन उलीशन कर्त्याना डावलून दुसरेच मुले लावण्याचा षडयंत्र सुरू केले. त्यामुळे उपोषण कर्ते तरुण व ग्रामपंचायतने दिलेल्या यादिवरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. उपोषण कर्ते तरुणांना लेखी आश्वासन कंपनीने दिल्यानंतर ग्रामपंचायतने यादी देऊन तरुणांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एक लोकप्रतिनिधी व त्यांचे स्वयंघोषित पुढारी यांनी उपोषण कर्ते तरुणांना रोजगार मिळू नये याकरिता कंपनीवर प्रचंड दबाव टाकत आहे.

कंपनी उपोषणकर्ते तरुणांना दोन वेळा आश्वास देऊनही नोकरिवर घेऊ नये असा दबाव असल्याचा कंपणीच्या एक अधिकाऱ्यांनी सुद्धा शेकडो तरुण व शासकीय अधिकारी यांच्या समक्ष सांगितले. त्यामुळे सदर लोकप्रतिनिधी विरुद्ध तालुक्यातील शेकडो तरुणांत प्रचंड संताप उसळला आहे. कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी असो त्यांनी स्थानिक तरुणांना रोजगार मिळावे याकरिता प्रयन्त करने आवश्यक असताना उपोषण कर्ते तरुणांना बेरोजगार ठेवण्यासाठी पवित्रा घेणरा लोकप्रतिनिधी कुणाचा असा संतप्त प्रश्न तालुक्यातील तरुण उपस्थित करीत आहे.

उपोषणकर्ते तरुनासोबत विविध समाजिक राजकीय संघटना व हजारो तरुण असतांना या एका लोकप्रतिनिधीलाच व त्यांच्या स्वयंगोषीत पुढार्यांनाच काय अडचण झाली आहे असाही प्रश्न तालुक्यातील जनता करीत आहे. सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा ज्वलंत प्रश्न तसेच जीवन मरणाचा प्रश्न असतांना वेगळे लोकांची यादी कंपनीला देऊन राजकार सुरू असल्याने बेरोजगार तरुणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

हे देखील वाचा:

संतापजनक: उपोषणकर्त्या बेरोजगार तरुणांची फसवणूक

उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी

Comments are closed.