पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच

मेंढोलीतील रहिवाशांची 150 कुटुंबांना, तर नगर पालिका शिक्षकांतर्फे 42 कुटुंबांना मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पूरगस्तांना मदतीचा ओघ अद्यापही सुरूच आहे. मेंढोली येथील ग्रामस्थांनी पूरग्रस्तांना 150 अन्न धान्याच्या कीटचे तर नगरपालिकेतील शिक्षकांनी 42 कुटुंबांना ब्लँकेट, चादर इत्यादींच्या किटचे वाटप केले. मेंढोली येथील ग्रामस्थांनी शेलू (बु), रांगणा, भुरकी व कोना या गावात किटचे वाटप केले तर न.प. शिक्षकांतर्फे शेलू येथे किटचे वाटप करण्यात आले.

मेंढोली येथील गावक-यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही काळासाठी शेतीचे कामे बाजूला सारली. त्यांनी गावातून शिधा गोळा करण्यास सुरूवात केली. गावक-यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्यातून गहू, तांदूळ, साखर, चहापत्ती, तेल, हळद, तिखट, मसाला, मीठ इद्यादी गोळा करण्यात आले. त्याची किट करून पूरग्रस्त गावात जाऊन या कीटचे वाटप करण्यात आले.

न.प. शिक्षकांची शेलू (खु.) गावात मदत
पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. शेलू खुर्द येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी येथील नगरपरिषद शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन निधी गोळा केला. या निधीतून पूरग्रस्तांना ब्लॅकेट, चादर, टॉवेलची एक किट तयार करून 42 कुटुंबांना देण्यात आली.

शेलू येथील सरपंच जनार्धन आवारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रविकांत वांढरे, मुख्याध्यापक गजानन कासावार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंडू कांबळे, नगरपालिकेचे ज्येष्ठ शिक्षक चंदू परेकर, विजय चव्हाण, काकासाहेब जायभाये उपस्थित होते. याप्रसंगी पूरग्रस्तांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र खरवडे यांनी केले. दिगंबर ठाकरे यांनी आभार मानले.

Comments are closed.