भास्कर राऊत, मारेगाव: एका युवकाने विद्युत खांबावरती चढून तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. सदर घटना तालुक्यातील बोटोणी येथे मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. बळीराम मारोती घाटे वय वर्ष (22) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गावाजवळील मागच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबावर बळीराम चढला. त्याने पोलवरील जिवंत तारांना स्पर्श करताच तो खाली कोसळला. गावक-यांनी बघितले असता बळीरामचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसर हदरला असून आत्महत्येचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मृतकाच्या पश्चात आई, दोन भाऊ व बहीण असा बराच आप्त परिवार आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post

Comments are closed.