● उपचारादरम्यान खाजगी दवाखान्यात मृत्यू
विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढोली येथील युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. सुनील कवडू येरकाडे (23) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुनीलने त्याच्या राहत्या घरी उंदीर मारण्याची औषध खाली घेउन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सुनील उलट्या होत असल्याने ही बाब घरच्यांच्या लक्षात आली. मित्राच्या मदतीने सुनीलला तात्काळ वणी येथील एका खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी 5.30 सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुनील हा गवंडी काम करीत होता. त्याच्या सारख्या होतकरू मुलगा गेल्याने मेंढोली गावात शोककळा पसरली आहे. मात्र सुनीलने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही. मृतक सुनील हा अविवाहित असून त्याच्या मागे आई, वडील, बहीण व आप्त कुटुंब आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.आज सुनिल वर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.