अखेर स्वराज्य युवा शेतकरी संघटना काँग्रेसमध्ये विलीन
'वणी बहुगुणी'चे भाकीत ठरले खरे, काँग्रेसला मिळणार मजबुती?
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यामध्ये घट्ट पाळेमुळे रोवलेल्या स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे अखेर काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. यासंबंधीची सर्वप्रथम ‘वणी बहुगुणी’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर अनेकांनी टीका करीत आश्चर्य सुद्धा व्यक्त केले होते. मात्र हे भाकित खरे ठरले आहे.
मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जि.प. सदस्या अरुणा खंडाळकर, जि. प.सदस्य अनिल देरकर, मारोती गौरकर, ता.अध्यक्ष, झरी ता.अध्यक्ष आशिष खुलसंगे, सभापती शीतल पोटे, वसंतराव आसुटकर, रवींद्र धानोरकर, यादवराव काळे, नंदेश्वर आसुटकर, आकाश बदकी उपस्थित होते.
मागील अनेक दिवसांपासून किन्हेकर गट हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशा वारंवार वावड्या उठत होत्या. त्यासंबंधीचे वृत्तही 22 ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आज दि. 4 डिसेंबरला स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे नेते आणि संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मारेगाव नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. स्वराज्य युवा शेतकरी संघटनेची ताकत काँग्रेसला मिळणार असल्याने नगरपंचायत निवडणुकांचे गणित पूर्णपणे बिघडणार असून याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार असे सूतोवाच राजकीय जाणकार करीत आहेत.
हे देखील वाचा:
Comments are closed.