मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवा – डॉ. करमसिंग राजपूत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजच्या विद्यार्थ्यांना प्रगल्भ बनवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमातील वाचनाव्यतिरिक्त इतर विषयावरील पुस्तक वाचण्याची आवड मुलांमध्ये रुजवा. एकवेळ घरातील एखाद्या गरजेच्या वस्तूंचा त्यागही पालकांनी करावा. मात्र घरी नवनवीन पुस्तकं पालकांनी आपल्या पाल्यासाठी आणायला हवे. त्यातून मुलांमुध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि नवी पीढी ही वैचारिकदृष्ट्या समृद्ध घडेल, असे मनोगत प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी केले. ते वसंत जिनिंग येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यातील मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. मादगी बहुउददेशीय संस्था, वणीच्या वतीने रविवारी दिनांक दि. 6.ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. सुनिल मिद्दे (महासचिव महासंघ, (M4) यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मनोगतात त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी जी मदत लागेल ती महासंघाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार) हे होते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रम व जिद्द बाळगल्यास बिकट परिस्थितीवरही सहजपणे मात करता येते असे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर लाटेलवार (उपकोषाध्यक्ष महासंघ,(M4), विठ्ठल शंकावार (जेष्ठ समाजसेवक), व्यकंटी अंधेवार, प्रदिप आधारे (उपाध्यक्ष M4),BMS अध्यक्ष निलेश परगंटीवार, संस्थेचे सचिव सुरज चाटे, सहसचिव रवी कोमलवार, दिपक गुल्लमवार, जी.आर्.रेड्डी, कोषाध्यक्ष नत्थु नगराळे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात दहावी व बारावी परिक्षेत गुणवंत विद्यार्थी तसेच इतर विविध प्रकारच्या परिक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तालावार व अजय कंडेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन अरुण अरुण एनपल्लिवार यांनी केले. या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी सूरज चाटे, रवि कोमलवार, राकेश शंकावार, किशोर मंथनवार, विक्की पगंटीवार, विजय कंडेवार, रीतिक मामिडवार, रीतिक बेलेवार, नागेश मोहूर्ले, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, मनिष वालकोंडे, मोरेश्वर कुंटलवार, कैलास पौन्नलवार व आदींनी परिश्रम घेतले.
Comments are closed.