पंचशील नगर येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता

दोन आठवड्याआधी घरून गेला निघून

0

जितेंद्र कोठारी, वणी: पंचशील नगर येथील एक अल्पवयीन मुलगा हरवल्याची तक्रार वणी पो.स्टे.ला दाखल करण्यात आली आहे. सदर मुलगा हा गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णकुमार शुभंकर ठाकूर (16) असे हरवलेल्या मुलाचे नाव आहे.

कृष्णकुमारच्या आई कमल शुभंकर ठाकूर (55) रा. पंचशील नगर वणी हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 363 भादवी अनव्ये मिसिंगची तक्रार दाखल करून शोध घेणे सुरु केले आहे. तक्रारीनुसार इयत्ता नववीचा विद्यार्थी कृष्णकुमार शाळा बंद असल्यामुळे घरीच राहत होता.

दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान तो कोणालाही न सांगता घरुन निघून गेला. घरच्या लोकांनी नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो मिळून आलं नाही. अखेर कृष्णकुमारच्या आईने रविवार 21 फेब्रुवारी रोजी मुलगा हरवल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

निर्गुडा नदीत आढळले वृद्ध व्यक्तीचे प्रेत

झरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार

 

Leave A Reply

Your email address will not be published.