वडिलांकडे जातो म्हणून निघाला व घरी परतलाच नाही

विवेक तोटेवार, वणी : येथील लालपुलीया परिसरात ट्रक चालक असलेल्या वडिलांकडे जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरून निघाला. मात्र तो वडिलांकडे पोहचलाच नाही आणि परत घरी ही आला नाही. सगळीकडे शोध घेऊन ही मिळून न आल्यामुळे अखेर वडिलांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. 

Podar School 2025

फिर्यादी संजय केवट हे येथील लालपुलीया परिसरात खाजगी ट्रक चालक म्हणून काम करतात. त्यांची पत्नी व तीन मुले त्यांच्या मूळ गावी उत्तरप्रदेश येथे राहतात. तर संजय हा आपल्या आईवडीलांसह आर.आर .सिटी वणी येथे वास्तव्यास आहे. शाळेला सुट्या असल्याने त्यांचा मोठा मुलगा पंकज हा उत्तरप्रदेश येथून आपल्या वडिलांकडे राहावयास आला. 22 जून रोजी मुलगा पंकज हा घरी करमत नसल्याने वडिलांकडे जातो असं आजीला सांगून घरून निघाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सायंकाळी चालक संजय केवट हा ड्युटी संपवून घरी आल्यावर त्यांनी आईला पंकज बाबत विचारणा केली. तेव्हा आईने सांगितले की पंकज दुपारीच लालपुलीया येथे जातो म्हणून घरून निघाला. त्यांना समजले की पंकज हा त्यांच्याकडे आलाच नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना याबाबत विचारणा केली. आपल्या मूळ गावात देखील फोन करून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पंकज मिळून आला नाही. 

शेवटी वडील संजय देवशरण केवट (39) यांनी 23 जून रोजी वणी पोलिसात त्यांचा अल्पवयीन मुलगा पंकज संजय केवट (17) हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची कलम 363 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोऊनी प्रवीण हिरे व वसीम शेख करीत आहे.

हे सुद्धा वाचा – 

 

Comments are closed.