कॉलेजला जाण्यासाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी सकाळी घरून कॉलेज जाण्यासाठी निघाली मात्र ती परत आलीच नाही. नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेऊनही तिचा काही पत्ता लागला नाही. तसेच तिच्याकडे असलेला मोबाईलसुद्धा बंद आहे. शेवटी मुलीच्या आईने भावाला सोबत घेऊन शिरपूर पोलीस स्टेशन येथे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

फिर्यादी महिला शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात आपल्या दोन मुलीसोबत वास्तव्यास असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मोठी मुलगी घुग्गुस येथील एका महाविद्यालयात बी.ए. प्रथमवर्ष मध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता मुलगी कॉलेजला जाते म्हणून घरून निघाली. मात्र सायंकाळ होऊनही ती घरी परत आली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या आईने मुलीच्या मोबाईलवर फोन केला. परंतु तिच्याकडे असलेला मोबाईल नंबर बंद दाखवत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सर्वत्र शोध घेऊनही मुलगी मिळून आली नाही. त्यामळे फिर्यादी महिलेने 16 सप्टेंबर रोजी शिरपूर पोलीस स्टेशन येथे तिच्या 17 वर्ष 7 महिन्याची मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. शिरपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्द कलम 363 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.  

Comments are closed.