अल्पवयीन मुलीचे वेळोवेळी बळजबरी शोषण, मुलगी गर्भवती

झरी तालुक्यातील घटना, आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

0

सुशील ओझा, झरी: एका तरुणाने शाळेत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीचे जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक शोषण केले. आरोपी दोन वर्षांपासून जिवे मारण्याची धमकी देत पीडितेचे शोषण करत होता. दरम्यान पीडित मुलगी 6 महिन्याची गर्भवती राहिली. या प्रकरणी जुनोनी येथील एका तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडिता ही तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. आई वडिलांसह ती राहते. दोन वर्षांआधी ती तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत शिकायची व तिथेच राहायची. 2019 रोजी दिवाळीच्या सुट्टीत पीडिता ही शाळेतून घरी आली. त्यानंतर ती शाळेत गेलीच नाही. 11 जुलै 2021 रोजी पीडितेने तिच्या आईला पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आईने तिला वणीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी चेकअप करून ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकूण पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. घरी आल्यावर पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक बाब पुढे आली.

आरोपी विलास तुकाराम आत्राम (25) हा तरुण जुनोनी येथील रहिवासी आहे. दोन वर्षांआधी पीडिता शाळेत शिकताना आरोपीची पीडितेशी ओळख झाली. एके दिवशी पीडिता प्रात:विधीला गेली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. पीडितेला थांबवून त्याने तिला एका शेतात नेऊन बळजबरीने शोषण केले. पीडिता गावात गेल्यानंतर आरोपी वेळोवेळी गावात यायचा व तो पीडितेला धमकावत तिचे शोषण करायचा. दोन वर्षांपासून आरोपी पीडितेवर अत्याचार करीत होता.

पीडितेने नकार दिला किंवा कुणाला काही सांगितल्यास आईवडिलांना ठार मारेल अशी धमकी आरोपी द्यायचा. दरम्यान 15 दिवसाआधी पीडिता गर्भवती असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना झाली. 12 जुलै रोजी पीडितेची आई ही आरोपीस याबाबत विचारणा करण्यास जुनोनी येथे गेली असता तिथेही आरोपीने पीडितेच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेच्या आईने सदर बाब तिच्या नातेवाईकांना सांगितली असता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास हिम्मत दिली. अखेर पीडितेच्या आईने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत आरोपी विलास तुकाराम आत्राम (25) याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात भादंविच्या कमल 376 (2)(N) 376 (A)(1) बाललैंगिक अत्याचार कायदा (पोस्को) च्या कलम 4 व 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जितेश पानघाटे, प्रवीण तालकोकुलवार करीत आहे.

हे देखील वाचा:

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

तणनाशक पिऊन हटवांजरी येथील शेतक-याची आत्महत्या

तेजापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासधूस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.