अल्पवयीन मुलगी शेतातून घरी आली, आई वडील येण्यापूर्वीच बेपत्ता झाली

जितेंद्र कोठारी, वणी: आई-वडिल मजुरीसाठी गेल्याने अल्पवयीन मुलगी लवकर घरी आली. सायंकाळी आई वडील घरी आले तेव्हा मुलगी घरात दिसून आली नाही. गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात त्याची अज्ञान मुलीला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीच्या वडिलांना 3 मुली आहे. त्यातील 2 मुलींचे लग्न झाले आहे. सर्वात लहान मुलीने वणी येथील एका महाविद्यालयातून नुकतेच 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. ती आई वडिलांसोबत गावात राहत होती. दिनांक 7 जुलै रोजी सदर मुलगी आई वडिलांसोबत दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. मात्र शेतातून ती लवकर परत घरी आली. आई वडील सायंकाळी 6 वाजता घरी आले असता मुलगी घरात दिसून आली नाही.

कुटुंबीयांनी आजूबाजूला शेजाऱ्याकडे तसेच चारगाव व वणी येथील नातेवाईकांकडे मुलीबाबत विचारणा केली असता ती कुठही मिळून आली नाही. अखेर बेपत्ता मुलीच्या वडिलांनी आपल्या भावासोबत शिरपूर पोलीस स्टेशन गाठून त्यांची 17 वर्ष 11 महिन्याची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. बेपत्ता मुलगी अल्पवयीन असून फुस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे .

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.