बहुगुणी डेस्क, वणी: महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी सकाळी घरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली. मात्र ती घरी परत आलीच नाही. नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेऊनही तिचा काही पत्ता लागला नाही. तसेच तिच्याकडे असलेला मोबाईलसुद्धा बंद आहे. शेवटी मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या पालकांना आहे.
फिर्यादी हे वणी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ते त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. गावात कॉलेज नसल्याने मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला (वय 17 वर्ष 7 महिने) दुस-या गावात कॉलेजसाठी पाठवले. ती तिच्या एका नातेवाईकांच्या घरी गेल्या एक महिन्यापासून राहत होती. गुरुवारी दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मुलगी कॉलेजला जाते म्हणून घरून निघाली. मात्र सायंकाळ होऊनही ती घरी परत आली नाही.
तसेच मुलीला मोबाईल नंबर देखील बंद होता. मुलीच्या नातेवाईकांनी याची माहिती त्वरित तिच्या वडिलांना दिली. तिच्या वडिल तातडीने मुलगी राहत असलेल्या गावी पोहोचले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मैत्रिणी व नातेवाईकांना कॉल केला. दोन दिवस शोध घेतल्यानंतर मुलीचा काही पत्ता लागला नाही. त्यांना मुलीला कुणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. अखेर शनिवारी मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


Comments are closed.