देशी दारूची सुरु होती तस्करी, पोलिसांनी लावला ट्रॅप

देशी दारूचे पव्वे जप्त, वणीतील एकाला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी पळसोनी रोडवर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले. त्याच्याकडून 12 हजारांची देशी दारूसह मोटरसायकल असा सुमारे 72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी रात्री पावने आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली. 

वणी पोलिसांची चमू राजूर बिटमध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबरीकडून वणीहून पळसोनीकडे अवैध दारूची मोटरसायकलवरून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पंचांसह पळसोनी रोडवर गस्त घातली. दरम्यान पावने आठ वाजताच्या सुमारास त्यांना समोरून एक हिरो डेस्टीनी ही मोटरसायकल (MH 29 BZ 9537) येताना दिसली. त्यांनी मोटार सायकल थांबवली. मोटरसायकलच्या डिक्की आणि सिटवर देशी दारूची 90 एमएल ची 300 प्लास्टिक शीश्या (एकूण किंमत 12,000 रुपये) आढळल्या.

पोलिसांनी चालकाला परवान्याबाबत विचारणा केली असता चालकाकडे परवाना नव्हता. पोलिसांनी दारू व मोटारसायकल असा एकूण 72,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी राहुल केशवराव नागतुरे (वय 39, रा. माळीपुरा वार्ड क्र. 11, वणी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम 65(37)(4/7) आणि मोटार वाहन कायदा, कलम 3(1)/181 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल अविनाश वामणराव चिकराम, रितेश इत्यादींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पार पाडली.

Comments are closed.