पाटण येथील कोविड सेंटरला आमदार बोदकुरवार यांची भेट
रुग्णांच्या सोयी-सुविधांबाबत घेतला आढावा
सुशील ओझा, झरी: तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण झरी येथील नगरपंचायतीमध्ये व पाटण येथील नवीन रुग्णालयात भरती आहेत. या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष आहे की नाही तसेच त्याची सुविधा व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्याकरिता वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाटण येथील कोविड सेंटरला भेट दिली.
आमदार बोदकुरवार यांनी कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधून रुग्णांच्या सोयी-सुविधा बाबत चर्चा केली. तसेच अन्य माहिती घेतली. कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रग्णांना फळांची सुविधा उपलब्ध करुन दिली.
याप्रसंगी पं.स.झरी सभापती राजेश्वर गोंड्रावार, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश नाकले, अशोकरेड्डी बोदकुरवार, सुरेश बोलेनवार, सतीश दासरवार, प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम , पं. स. विस्तार अधिकारी इसलकर उपस्थित होते.
हे देखील वाचा:
दिलासा: आज रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक, रुग्णसंख्येचा दरही घटला