एवढ्याशा चुकीचा मनसेला बसला फटका

आचारसंहितेचा भंग प्रकरणी गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी वणीतील छत्रपती शिवाजी चौकात तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम मनसेने घेतला. या दरम्यान परिसरात सजावट करण्यात आली. त्यात मनसे कार्यकर्त्याकडून मनसेचा झेंडा लावण्यात आला होता. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एका मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चुकीचा मनसेला चांगलाच फटका बसला आहे.

गुरुवारी शिवतीर्थावर तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर जगदंबेच्या मुखवट्यावर मनसेचा झेंडा लावण्यात आला होता. या झेंड्यावर मनसे पक्षाचे चिन्ह व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव होते. कुणाचीही परवानगी न घेता पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. व्हिडीओ सर्वेक्षण टीम यांच्याद्वारे व्हिडीओग्राफी केल्यानंतर ही बाब लक्षात आली. जी एम देठे पथक प्रमुख (VST) यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कार्यक्रमाचे आयोजक सुनील पुराणकर यांच्याविरुद्ध कलम 188, 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.