दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी कोसळली

शेतगड्यासह बैलाचा मृत्यू, मोहदा येथील घटना

0
विलास ताजने, वणी : दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी पडून शेतगड्यासह बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मोहदा येथे दि.१८ मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. राहुल रामाजी मेश्राम वय ३२ रा. सुकनेगाव असे मृतकाचे नाव आहे. मोहदा येथील शेतकरी शंकर ढुमने यांच्याकडे तो शेतगडी म्हणून चाकरी करीत होता. 

ढुमणे यांचे डोर्ली शिवारात शेत आहे. सदर शेतातुन येत असताना बैलबंडी खोल पाणी भरलेल्या खड्ड्यात पडली. सदर दगडी खाण वणीच्या पाराशर यांच्या मालकीची असल्याचे समजते. सदर परिसरात दगड वाहुन नेणाऱ्या ट्रकची ये-जा सुरू असते. दगड वाहून नेणाऱ्या ट्रकला बैल बुजाडल्यामुळे सदर घटना घडल्याची गावात चर्चा आहे. या घटनेत एक बैल वाचला आहे.

वणी तालुक्यातील मोहदा येथे गिट्टी क्रशरचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यासाठी लागणारा दगड गावालगतच्या शेतपरिसरातील खाणीतून काढल्या जातो. मात्र दगडाचे उत्खनन केलेल्या प्रचंड खोल खड्डयांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण कुंपण केलेले नाही. याठिकाणी पाणी पिण्यासाठीही जनावरांची वर्दळ असते. गत वर्षी २४ जुलैला एका माणसाचा मृतदेह दगडी खाणीत आढळला होता. मृतकाच्या मागे वडील, पत्नी आणि एक वर्षाच मुलगा आहे. शिरपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.