तरुणाचा घरात घुसून कॉलेज कुमारिकेचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: एका कॉलेज कुमारिकेसोबत एका तरुणाने विनयभंग केला. दरम्यान मुलीने आरडाओरड केल्याने घरी शेजारी धावून आले. मात्र झालेल्या प्रकारानंतर बदनामी होईल या भीतीने आरोपीने त्याच्या घरी जाऊन विष प्राशन केले. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीवर चंद्रपूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.  

सविस्तर वृत्त असे की पीडिता 17 वर्षांची कॉलेज कुमारिका असून ती मारेगाव येते ज्यु. कॉलेजमध्ये शिकते व तालुक्यातील एका गावामध्ये तिच्या आई वडिलांसोबत राहते. तिच्या घरा शेजारीच आरोपी (23) राहतो. बुधवारी दिनांक 19 एप्रिल रोजी पीडितेचे कुटुंबीय हे देवकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. पीडिता घरी एकटीच असताना दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास आरोपी हा तिच्या घरी गेला व पीडितेला घरी चलण्यासाठी जबरदस्ती करू लागला.

पीडितेने नकार दिला असता त्याने मुलीशी जबरदस्ती करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने आरोपीला धक्का देऊन आरडा ओरड केली. दरम्यान गोंधळ ऐकून घराशेजारीच राहत असलेली पीडितेची काकू ही धावत पीडितेच्या घरी आली. काकूने आरोपीला मुलीला हात कसा लावला अशी विचारणा केली असता आरोपीने काकूला धमकी दिली. तसेच याची कुणाजवळ वाच्छता केली तर कोणाला सोडणार नाही अशी धमकी ही त्याने दोघांना दिली. दरम्यान पीडितेचे कुटुंबीय घरी परताना दिसता आरोपीने तिथून पळ काढला.

पीडितेने सदर घटना कुटुंबीयांना सांगून संध्याकाळी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. झालेली संपूर्ण घटना मुलीने पोलिसांनी कथन केल्यावर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीवर भादंविच्या कलम 354, 354 अ, 323, 506, पोक्सोच्या 8 व 12 कलमसह गुन्हा दाखल केला.

आरोपीची विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
आरोपी पीडितेचा विनयभंग करण्याच्या प्रयत्नात असताना मुलीने आरडा ओरड केली व मुलीची काकू घटनास्थळावर आली. मुलीने झालेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे गावात बदनामी होईल या भीतीने आरोपीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विश प्राशन केल्याचे लक्षात येताच आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या आरोपीवर चंद्रपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Comments are closed.