बहुगुणी डेस्क, वणी: शेताच्या धु-यावर ठेवलेली दुचाकी अज्ञात समाजकंठकाने जाळली. शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास घोन्सा-दहेगाव शेतशिवाराजवळ घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज ठामेश्वर निखाडे हे दहेगाव येथील रहिवासी आहे. यांनी दहेगाव लगत किलोना शिवारात चार एकर शेती ठेक्याने घेतली आहे. त्यांच्याकडे प्लेझर ही मोपेड (MH29 BQ9615) आहे. दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या मोपेडने शेतावर गेले होते. शेतालगत त्यांनी गाडी उभी केली व ते शेताची पाहणी करण्यासाठी गेले. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ते परत आले असता त्यांना त्यांची मोपेडजवळ आग लागलेली आढळली. ते मोपेडजवळ गेले असता त्यांना मोपेड आगीत खाक झालेली दिसली.
त्यांनी तात्काळ मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 435 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
Comments are closed.