उद्या ओबीसी मोर्चानिमित्त शहरात मोटार सायकल रॅली

ओबीसी मोर्चाला बारी समाजाचे समर्थन

0

जब्बार चीनी, वणी: ओबीसींची (OBC, VJ, NT, SBC) स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी 3 जानेवारीला वणीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त उद्या दिनांक 1 जानेवारीला दुपारी 12 वाजता भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली ओबीसी मोर्चा कार्यालय आशीर्वाद हॉटेलच्या मागे वणी येथून निघणार आहे. ओबीसीच्या विराट मोर्चानिमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शहरी व ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ओबीसी मोर्चाला बारी समाजाचे समर्थन
बुधवारी दुपारी 3 वाजता बारी समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष गणेश धानोरकर यांच्या घरी ओबीसी मोर्चासंबंधी बैठक झाली. या मोर्चात एकमताने ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्याचे ठरले. बारी समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. या बैठकीचे प्रास्ताविक गणेश धानोरकर यांनी केले तर नंदकिशोरजी जवळे यांनी उपस्थितांसमोर मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी नगरसेवक नीलेश होले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजकांतर्फे राम मुडे, प्रवीण खानझोडे यांनी सर्व बारी समाज बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. बैठकीला अमोल धानोरकर, दिपक खडसे, ललित धानोरकर, प्रियांशु धानोरकर, अश्विनी धानोरकर (अध्यक्ष-बारी महिला बचत गट), अंजली होले, सरला खडसे, रेखा धानोरकर, रेखा चौधरी, जया तुंबडे, सविता धानोरकर, छाया तुमडे, ज्योती धानोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने बारी समाजातील व्यक्ती उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये

हे देखील वाचा:

वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

Leave A Reply

Your email address will not be published.