शेतकरी व सामान्य जनतेचे वीज कनेक्शन तोडू नये: खा. धानोरकर
झरी येथील आढावा बैठकीत वीज वितरण कंपनीला तंबी
सुशील ओझा, झरी: येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजता तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठक तालुक्यातील विविध कामे व खराब रस्ते संदर्भात घेण्यात आली. बैठकीत सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.
खासदार धानोरकर यांनी उपस्थित विभागाचे सर्व अधिकारी यांना गोरगरीब जनता, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य लोकांना शासकीय काम असो अथवा इतर कोणत्याही कामाला विभागाकडून त्रास होता काम नये अन्यथा मी माझ्या पद्धतीने सर्वांना धडा शिकवणार असे बजावले. त्यानंतर कृषी विभागाला धारेवर धरले व शेतकऱ्यांना शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती त्यांच्यापर्यत पोहचली पाहिजे व शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता उपाययोजना करण्याचे सांगितले.
गरीब शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याला लाभ घेता येणार नाही याची दक्षता घेण्याचे ठणकावून सांगितले. तसेच वीजवितरण कंपनीच्या अधिकारी यांना शेतकरी पासून तर सर्वसामान्य जनतेचे वीज कनेक्शन कोणत्याही परिस्थितीत कापन्यात येऊ नये तसेच बिल जास्त असेल त्यांना इस्टलमेंटची सुविधा द्यावी व वीजबिल भरणा करून घ्यावा. परंतु वीज कापण्यास सक्त मनाई केली आहे व तसे आदेश दिले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सर्व जनतेनी मास्क व सैनिटायझर चा वापर करून कोरोंना पासून बचाव करावे असे आवाहन सुद्धा खासदार यांनी जनतेला केले आहे. आशिष खुलसंगे यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या रोजगार प्रश्न सोडविण्या करिता स्थानिक पातळीवर एक आढावा बैठक घेण्यात यावे असा मुद्दा खासदार यांच्यासमोर मांडला, त्या अनुषंगाने पुढच्या ही बैठक घेण्यात येणार आहे.
वणी- केळापूर- आर्णी मतदार संघातील सर्व जनतेला कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा अधिकारी यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे त्यामुळे झरी तालुक्यासह संपूर्ण मतदार संघात कोरोनाची लास उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहे.
वबैठकीत खासदार यांच्यासह मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे,संचालक राजू येलतीवार,तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, देविदास काळे,तहसीलदार गिरीश जोशी,नरेंद्र ठाकरे,ओम ठाकूर,रामन्ना येल्टीवार ,इजहार शेख,येल्टीवार,प्रकाश कासावार,संदीप बुरेवार, निलेश येल्टीवार, प्रकाश म्याकलवार,रमण डोहे, भूमारेड्डी बाजनलावार, पुरुषोत्तम आवारी,सुरेश भेदूरकर उपस्थित होते तर अधिकारी वर्गात तहसीलदार यांच्यासह गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,कृषी अधिकारी,उपकार्यकरी अभियंता (विजवीतरण) व ठाणेदार उपस्थित होते.
हे देखील वाचा: