डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून मुदोटी गावातील पाणीसमस्येचे समाधान

आदिवासी पाड्यासाठी डॉ. लोढा ठरत आहे 'जलदूत'

0

सुनील इंदुवामन ठाकरे, झरी: तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या मुदोटी या गावात पाणी समस्येने गावकरी त्रस्त झाले होते. जवळपास 100 घरांची व अंदाजे 400 लोकवस्तीचे हे गाव. पाण्याचे एकमेव स्रोत म्हणजे गावातील विहीर आहे. या विहीरीत प्रचंड गाळ साचला होता. त्यामुळे पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली होती. संपूर्ण गावकऱ्यांना वर्षभर या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागायचे. डॉ. महेंद्र लोढा यांच्या निदर्शनास ही बाब आली. ते स्वतः जातीने या अत्यंत दुर्गम गावात गेले. त्यांना कळलं की, त्या विहिरीला आधी मुबलक पाणी असायचं. ही 40 फूट घेर असलेली मोठी विहीर आहे. फक्त गाळ साचल्यामुळे ही पाणीसमस्या उद्भवली होती. मग डॉ. लोढा यांनी स्वखर्चाने यातील गाळ काढण्याचे ठरविले.

क्रेन लावून सातत्याने तीन दिवस हा गाळ काढण्यात आला. संपूर्ण गाळ काढल्यामुळे विहीरीचे झरे मोकळे झालेत. पाच फुटापर्यंत पाणी लागले. विहीरवरची जुनी मोटर व पाईपलाईनची दुरुस्ती करवून घेतली. त्यामुळे एवढ्या भीषण उन्हाळ्यातदेखील पुरेसे पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नातून या पाणीसमस्येचे निवारण झाले. नागरिकांनी त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. लोढा हे विद्यार्थीदशेपासूनच अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी वणी शहरातदेखील ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.