मुकुटबन येथे पशुचिकित्सा व अडेगाव येथे आरोग्य शिबिर

0

रफिक कनोजे, मुकुटबन :-  मुकुटबन येथील  पशु चिकित्सालयात पशुचिकित्सा शिबीर घेण्यात आले त्या निमित्त ५४ शेतकऱ्याच्या जनावराना लसीकरण, वांझपना निवारण तसेच आधार लिंक करुन औषधी गोळ्या वाटप करण्यात आले. तक अडेगाव येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यात ६५ महिलांची मधुमेह, रक्तदाब, गर्भवती महिला व नवविवाहित महिला यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ह्या कार्यक्रमात एम  पी बिर्ला समूह व रिलायन्स सिमेंट कंपनी चे उपाध्यक्ष अरुणकुमार सिंग, दिपक शिंत्रे, कृष्णकुमार राठोड, कुलकर्णी, धनोडकार , योगेंद्र कुमार मानापुरे , दीपक एकूणकर ,  अनिल ताडपल्लिवार, पशु वैद्यकीय अधिकारी  देवकर  व आसिफ शेख यांनी अथक परिश्रम घेतले.

तसेच मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल व मातोश्री पुनकाबाई आश्रम शाळेत विद्यार्थ्याना फूटबॉल प्रशिक्षक अफरोज खान, मो. शहजाद, अनवर शेख व आसिफ शेख यांच्याकडून शनिवार पासुन फुटबॉल खेळाचेचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.