सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायात म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन गावात सुरू असलेल्या ग्रामस्वच्छता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दर आठवड्यात घरपोच कचरा जमा करून गाव स्वच्छ करताना ग्रामपंचायत दिसत आहे.
ग्रामपंचयात मध्ये १५ सदस्य व एक सचिव अशी बॉडी असून सरपंच उपसरपंच व सदस्य एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी झटत आहे. गावातील जनतेला शुद्ध पाण्याचे तीन आरो प्लांट बसविण्यात आले. पावळ्यापूर्वी गावातील पाचही वॉर्डातील नाल्याची सफाई करण्यात आली व आठवड्यातून एकदा प्रत्येक वॉर्डातील नाली साफ केल्या जाते. नाल्या सफाई करिता ग्रामपंचयातने वेगळी टीम तयार करून हे कार्य करीत आहे त्यात ७ ते ८ गावातीलच कामगार ठेवण्यात आले.
प्रत्येक वॉर्डात, चौकात, पान टपरीवर, दुकानासमोर प्लास्टिक तसेच खर्रा पन्नी व इतर कचरा फेकला जात होता ज्यामुळे रस्त्यावर चौकात कचऱ्याचे ढिगारे दिसत होते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे ग्रामवासीयांच्या आरोग्यावर परिणाम होत होते. जनतेला वेगवेगळ्या आजाराचा सामना करावे लागत होते. या सर्व गोष्टीचा विचार करून ग्रामपंचयातने लाखो रुपये खर्च करून गावातील २ हजार कुटुंब व दुकानदारांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
गावकऱ्यांच्या घरातील दुकानातील ओला व सुखा कचरा डस्टबिन मधे भरून कचरा गाडीत टाकण्याचे ग्रामपंचायतने सक्तीचे केले आहे. कचरा भरून नेण्याकरिता गाडीची व्यवस्था करण्यात आली असून दर चार दिवसात एकदा प्रत्येक वॉर्डातील घरासमोर कचरा गाडी येऊन कचरा घेऊन जात आहे. कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकल्यास कायद्याने कार्यवाही सुद्धा होणार आहे.
कचरा गाडीचालक गाडीवर लाऊड स्पीकर ( भोंगा ) लावून गावकऱ्यांना आवाज देत कचरा जमा करून घेऊन जातो ज्यामुळे मुकूटबन गाव ७० टक्के पेक्षा जास्त स्वछ झाल्याचे दिसत आहे. कच्याचे ढिगारे व घरातील ओला व सुखा कचरा गावबाहेर नेत असल्याने गाव स्वछ होत आहे व आरोग्याचा प्रश्न सुटत आहे. गावाच्या विकासाकरिता सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर चेलपेलवार सचिव कैलास जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य , पत्रकार व इतर पक्षातील पदाधिकारी व ग्रामवासी यांच्या सहकार्यने होत आहे.