मुकूटबन ते वणी ३२ किमी मजुरांच्या झारखंडला जाण्यासाठी रांगा

कंपनीने मजुरांना सोडले वा-यावर, उन्ह पावसात मजुरांची पायपीट

0

सुशील ओझा, झरी: कंपनी कोणत्याही प्रकारची मदत करीत नसून मजुरांच्या प्रश्नावर कंपनीने हात वर केल्याचा आरोप करत मुकुटबन येथील सिमेंट कंपनीतील दोन ते अडीच हजार कामगारांपैकी अर्धा अधिक मजुरांनी पायीच घराची वाट धरली असून सध्या उन्ह पावसात या मजुरांची बायको मुलांसह पायपीट सुरू आहे. या मजुरांनी कंपनी व ठेकेदाराने अनेकांचे पगार दिले नसल्याचेही सांगितले आहे. स्वगृही जाण्याकरिता शेकडो कामगारांनी आपले नाव व ओळखपत्राची कागदपत्रे सुद्धा दिली. परंतु कंपनीने हात वर केल्याचे दिसताच मजुरांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. ६ मे दुपारपासून झारखंड येथील १ हजार मजूर पायदळ जाण्याकरिता निघाले आहे. परिणामी मुकुटबन ते वणी या 32 किलोमीटच्या रस्त्यावर मजुरांच्या रांगा दिसत होत्या.

मुकूटवन येथे आरसीसीपीएल ही सिमेंट फॅक्टरी आहे. रिलायन्सची फॅक्टरी एशियातील ही दुस-या क्रमांकाची फॅक्टरी मानली जाते.. परंतु लॉकडाऊन मुळे फॅक्टरीचे काम ठप्प पडले होते. कंपनीत कामगार व कर्मचारी म्हणून ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इतर राज्यातील काम करीत असून सर्वच कामगार लॉकडाऊन मुळे फसले व आपल्या स्वगृही जाण्याकरिता धावपळ करीत होते. परंतु अनेक मजुरांनी त्यांच्यावर बीतलेली कहाणी डोळ्यात अश्रू आणून सांगितली.

सिमेंट कंपनीत या मजुरांना त्रास होत असल्याने खूप त्रास सहन करण्यात आल्याचे सांगत पायदळ वणी मार्गाने निघाले. मुकूटबन ते वणी ३२ कीमी रस्त्याने वणीपर्यत एकच लाईन दिसत होती. वणी मार्गाने जाणाऱ्या कामगारांना पाहून प्रत्येक गावातील जनता एकसारखी पाहत होती. सिमेंट कंपनीने कामगारांना घरी जाण्याकरिता कोणतीही मदत केली नसल्याचे अनेक कामगारांनी सांगितले.

मजुरांनी व्यक्त केल्यात भावना…

गरीब कामगारांच्या डोळ्यातील अश्रू व त्यांना घरी जाऊन आपल्या कुंटूबाची भेटण्याची भूक पाहून त्यांना बघणा-यांचे मन हेलावून गेले. दोन महिन्यांपासून आपल्या आई वडील पत्नी भाऊ बहीण मुलगा यांच्या आठवणीत कामगारांनी मोठे कठीण दिवस काढल्याचे अनेकांनी सांगितले. हजार कामगार सिमेंट कंपनीतून पायदळ झारखंड ७०० ते ८०० किमी अंतर पायदळ जाणार असून या कामगारांना काही झाल्यास याला जवाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कामगारा प्रति कंपनीची काही जवाबदारी नाही का असाही संतप्त प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.