नायगाव रोडवर पुन्हा अपघात एकाचा बळी

अज्ञात वाहन चालकविरुद्ध तक्रार

0 630
विवेक तोटेवार, वणी: 8 सप्टेंबर रविवारी सायंकाळी 8.30 वाजता नायगाव रोडवर अपघात झाला. ज्यात सुनील श्रीपत गेडाम (28) नामक इसमाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  सुनील हा काही कामानिमित्त आपल्या दुचाकी क्रमांक M H 34 AJ 3922 आपल्या मित्रासोबत वणीत आला होता. सायंकाळी परत जात असतांना 8.30 वाजताच्या सुमारास नायगाव बसस्थानाकजवळ  एका वाहनाने कट मारला.
सुनील व त्याचा मित्र अमोल अशोक इखारे (24) रा. चिंचोली जिल्हा चंद्रपूर खाली कोसळले. या अपघातात सुनीलच्या डोक्याला तर अमोल याच्या पायाला इजा झाली होती. सुनील व अमोल यांना काही लोकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुनीलच्या परिस्थिती अधिक गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. परंतु रक्तस्राव अधिक झाल्याने सुनीलाचा नेत असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला.
सुनीलच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरद्ध कलम 279, 337, 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments
Loading...