डोंगरगाव येथील नंदकिशोर माळवेची जगप्रसिद्ध ‘TISS’मध्ये निवड

एमए एज्युकेशन या अभ्यासक्रमासाठी निवड

0

जब्बार चीनी, वणी: डोंगरगाव येथील रहिवाशी असलेल्या नंदकिशोर माणिक माळवे या होतकरू विद्यार्थ्याची केवळ भारतातच नव्हे तर जगात नावाजलेली शिक्षण संस्था TISS म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एम. ए. एज्युकेशनसाठी निवड झाली आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी देशभरात एन्ट्रन्स एक्झाम घेण्यात आली. नंदकिशोरने नागपूर येथील सेन्टरवर ही प्रवेश परीक्षा दिली. या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दिनांक 12 मार्च ला टीस मुंबई येथे इंटरव्ह्यू झाला. याचा 20 जुलै रोजी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यात नंदकिशोरची निवड झाली. नंदकिशोरने एमए एज्युकेशन या कोर्ससाठी प्रवेश परीक्षा दिली होती.

नंदकिशोर माणिक माळवे हा झरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी असून त्याने सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ या महाविद्यालयातून सोशल सायंस या विषयात ग्रॅज्युएशन केले आहे. नंदकिशोर हा पारधी समाजातील असून एका सामान्य कुटुंबातून आला आहे. त्याच्या वडिलांचा अपघातात पाय गेल्याने तेव्हापासून त्याची आई शेती व तो मोलमजुरी व शेती करून आपले कुटुंब चालवतो.

नंदकिशोरने 12 जानेवारी रोजी लोक बिरादरी ची स्पर्धा उत्तिर्ण करून “महाराष्ट्र युवा भूषण पुरस्कार” हा 2020 चा पुरस्कार देखील मिळवला होता. त्या पुरस्काराचे मुंबई येथे वितरण करण्यात आले होते. ज्या शिक्षण संस्थेत केवळ देशातीलच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असते अशा नामवंत शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाल्याने नंदकिशोरचे परिसरात कौतुक होत आहे. नंदकिशोर आपल्या यशाचे श्रेय सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळचे शिक्षक, प्राचार्य, कार्तिक, एकलव्य टीमला देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.