नवरात्रीला दहा गावांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

शहरात 66 तर ग्रामीण भागात 78 दुर्गा मंडळ

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत दुर्गा देवी बसविण्याची परवानगी देण्यात येणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु यावर्षी वणी शहरात 66 दुर्गा मंडळे स्थापन करण्यात आलीत. तर ग्रामीण भागात 78 मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यातही 10 गावांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला.

या गावांमध्ये सर्व मंडळं मिळून फक्त एकच देवी बसवली आहे. महत्वाचे म्हणजे वणी पोलीस ठाण्यात दरवर्षी बसविण्यात येणारी दुर्गा देवी यावर्षी बसविण्यात येणार नसल्याची माहिती आहे. यावर्षी जवळपास 13 ते 14 दुर्गा मंडळांनी दुर्गा देवी न बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दुर्गा मंडळांना परवानगी देण्यात येणार नाही असे वाटत होते. परंतु प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून दुर्गा देवी बसविण्यात आल्या आहे. कोणत्याच रोडवर दुर्गा देवीची स्थापना यावर्षी करण्यात आली नाही.

त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मंदिर किंवा स्वमालकी हक्काच्या जागेवर दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. त्यातच फक्त 4 फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात परवानगी आहे.

प्रशासनाच्या नियमानुसार दुर्गा देवीजवळ लाऊडस्पीकर वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे. महाप्रसादाला यावर्षी परवानगी नाकारण्यात आली आहे. सोबतच आरती करण्यासाठी फक्त पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.