मारेगावात भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

शिवनाळा फाट्याजवळ रात्री दोन ट्रकची धडक

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शहरापासून जवळच असलेल्या शिवनाळा फाट्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजता दोन ट्रकची आमने सामने धडक होऊन एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत. जखमींना यवतमाळला हलविण्यात आले. मृतकाचे शव मारेगाव ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले.

मारेगाव शहरापासून जवळच असलेल्या राज्यमार्ग क्रमांक ६वरील शिवनाळा फाट्याजवळ करंजीकडून वणीकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी २८०६सिसिआर ट्रासपोर्ट कंपनीचा चालक घनश्याम दत्ता भारती २९नांदा फाटा ता. कोरपना जि. चंद्रपूर हा जागीच ठार झाला आहे. क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. त्यांना यवतमाळला हलविण्यात आले आहे.

तसेच वणीकडून करंजीकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ३४ एव्ही १२३१ चड्डा ट्रांसफोर्ट कंपनीचा चालक गंभीर जखमी झाला. त्यांना यवतमाळला हलविण्यात आले. वणीकडून करंजीकडे जाणार्‍या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या कॅबीन्स चकणाचूर झाल्यात. काही काळ या अपघाताने वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. तत्काळ वाहतूक सुरळीत चालू केली. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.