नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे’ धोरण ?

मारेगाव येथे पार पडली निवडणूक आढावा बैठक

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणूक संदर्भाने मारेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी वणी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जयसिंग गोहोकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती व यांच्या मार्गदर्शनात ही बैठक घेण्यात आली.

बैठकीत मारेगाव शहर आणि नगरपंचायत वार्डनिहाय उमेदवार ठरवण्यासंदर्भाने चर्चा करण्यात आली. येणारी निवडणूक ही स्वबळावर घड्याळ या चिन्हावर लढवण्याची असून त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागण्याचे आव्हानही डॉ महेंद्र लोढा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

जिल्हा सरचिटणीस आशिष मोहितकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश पिदूरकर, जिल्हा सरचिटणीस अंकुश माफूरॉ, तालुका अध्यक्ष भारत मत्ते, शहर प्रमुख मुन्ना शेख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी ठरणार गेम चेंजर?
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. आगामी निवडणुकीतही आघाडी होणार की मैत्रीपूर्ण लढत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राष्ट्रवादीने आतापासून एकला चलो ची भूमिका घेत तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी चौरंगी लढत झाली होती. यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले होते. शिवेसेनेचे 5, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे व भाजपचे 3 तर 2 नगरसेवक अपक्ष निवडून आले. दोन स्वीकृत नगरसेवकामध्ये 1 सेनेचा तर दुसरा राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे. परिसरात मारेगाव तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी स्वबळाची तयारी करत राष्ट्रवादी कामाला लागली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे कार्य गेल्या वेळी समाधानकारक असल्याने यावेळी मारेगावात राष्ट्रवादी काँग्रेस गेम चेंजर ठरू शकते.

बैठकीला जिल्हा संघटक भास्कर राऊत, उप तालुकाप्रमुख दयाल रोगे, विभाग प्रमुख विवेक पानघाटे, विभाग प्रमुख राजू पाचभाई, युवक तालुकाध्यक्ष पवन नक्षणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भेलेताई वरारकर, माजी नगरसेविका प्रतिभा तातेड, विजय टेकाम, भास्कर पिंपळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण वाचा…

झरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील आरक्षण जाहीर

हे पण वाचा…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दिवाळी बंपर’ ऑफरला सुरूवात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.