राजूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्थानिक तरुणांनांकडून सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत नेताजींच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे भाषणातून कथन केले तसेच आजच्या काळात नेताजींचे विचारांची का गरज आहे याची मांडणी केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला नेताजी बोस चौकातील त्यांच्या प्रतिमेला वरिष्ठ नागरिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला व त्याठिकाणी उपस्थित सर्वांनी आपले विचार व्यक्त केले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करीत असताना देशातील सर्व जाती व धर्माला एक समजून प्रत्येकाला गुलामीतून मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. त्याकरिता देशातील सर्व तरुण तरुणींना उद्देशून “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा!” असे आवाहन केले होते. पण आज स्वतंत्र्य देशात जाती आणि धर्माच्या उच्छाद वाढला असून जनता मूलभूत गरजांपेक्षा जाती आणि धर्मासाठी जीव द्यायला आणि घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही आहेत. असे विचार या प्रसंगी तरुणांनी मांडले.
या प्रसंगी शोभाताई उमरे, पो पाटील सरोज मून, कॉ. कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, महेश लिपटे, संदीप सिडाम, सुभाष पेंदाम, सतीश भडके, जाहिद हसन व अन्य उपस्थित होते.