झरी तालुक्यात आणखी कोरोना रुग्णाची वाढ

आरोग्य विभागासह कृषी विभागातही कोरोनाचा शिरकाव

0

सुशील ओझा, झरी: जिह्यासह तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झरी तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य विभागासह कृषी विभागही शिरकाव झाला आहे. धानोरा येथील २५ लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. तिथेच कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीसुद्धा तपासणी करण्यात आले. तपासणीत गावातील ३ व कृषी विभागाचे ३ व्यक्तीचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेत.

तसेच वाढोना ( बंदी) येथील ५ रुग्ण, सुसरी १ पॉजिटिव्ह आल्याने तालुक्यात १२ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. १२ कोरोना रुग्णामध्ये ४ गरोदर महिलांचा समावेश आहे. रुग्ण आढळताच शासकीय यंत्रणा पोहचली. रुग्णांना पाटण येथील कोविड सेंटरला पोहचवून त्या गावात १०० मिटर सर्कल बंदी करण्यात आली.

मागील आठवड्यात लिंगटी व येदलापूर येथील ४ कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात आरोग्य विभागाचे रुग्ण होते. पहिले आरोग्य व दोन दिवसात कृषी विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने इतरही कार्यालयात शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना पाटण येथील राजीव विद्यालयात ठेवले जाते. प

रंतु काही दिवसांपूर्वी इथे ठेवलेल्या कोरोना रुग्णांनी लाईन फिटिंगचे वायर, चार्जिंग प्लग व सिलींग पंख्याकरिता लावलेली वायर तोडल्याने प्रशासनाला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड सेंटर असल्यामुळे वायरिंग दुरुस्त करणारे फिटरसुद्धा फिटिंग करण्यास धजावत आहे. दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांना पंखा सुरू न झाल्याने तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी रात्री १ वाजता चिचघाट इथून पंख्याची व्यवस्था करून दिली.

कोरोना रुग्णांच्या व्यस्थेकरिता तहसीलदार खिरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम दिवसरात्र झटत आहे. शासकीय मनुष्यबळ कमी असताना कोरोना रुग्ण संख्या वाढ असल्याने दोन्ही विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.