नव्या मोबाईल टॉवरला छोरियावासियांचा विरोध

दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गणेशपूर या गावात छोरिया ले-आऊट आहे. तेथे नव्याने होत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. टॉवरपासून होणाऱ्या दुष्परिणामां जाणीव ठेवून टॉवरचे काम बंद करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत ग्रामपंचायत गणेशपूर यांना तक्रार देण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायत व सरपंच यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने शेवटी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. वणी शहरालगतच गणेशपूर हे गाव आहे. शहराचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत असल्याने वणीकरांनी या गावाच्या शेजारी लेआऊटमध्ये घरबांधणी करून राहण्यास सुरवात केली आहे.

या छोरीया लेआऊटमध्ये रिकाम्या असलेल्या जागेवर मोबाईल टॉवरचे काम करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायत गणेशपूर यांच्याकडून परवानगी मिळाली आहे. परंतु टॉवरमुळे ब्रेनट्युमर, कँसर, लकवा, वीज पडणे या समस्यांना नागरिकांना समोर जावे लागणार.

याबाबत ग्रामपंचायत व उपविभागीय अधिकारी यांना 20 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून याबाबत तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले. परंतु कोणतीही तपासणी झाली नाही. छोरीयावासियांनी याबाबत फोन केल्यास कुणाकडेही जा काहीच होणार नाही. अशी अरेरावीची भाषा वापरण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत योग्य तो निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी. सोबतच टॉवरचे काम बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.