न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी दीपक छाजेड, तर सचिवपदी परशुराम पोटे यांची निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून दीपक छाजेड तर सचिव म्हणून परशुराम पोटे यांची अविरोध निवड करण्यात आली. शहरातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी दिनांक 20 जुलै रोजी संघटनेच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेख इक्बाल यांची उपाध्यक्ष, नीलेश चौधरी सहसचिव तर कोषाध्यक्षपदी प्रविण शर्मा यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून माजी अध्यक्ष एम आसिफ शेख, रज्जाक पठाण, ज्ञानेश्वर बोनगीरवार यांची निवड करण्यात आली. विशाल ठोंबरे, महादेव दोडके, दिगांबर चांदेकर, रविन्द्र कोटावार, नरेंद्र लोणारे, नरेंद्र खोब्रागडे हे सदस्य राहणार आहेत.

न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशन हि शहरातील पत्रकारांची संघटना असून ही संघटना पत्रकारांचे विविध प्रश्न हाताळते. तसेच पत्रकारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारी एक नोंदणीकृत संघटना आहे. सामाजिक क्षेत्रातही ही संघटना कार्य करते.

Comments are closed.