जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एक्साईड बॅटरीचे अधिकृत वितरक व नाझ बॅटरीचे संचालक फहीम शेख (49) यांचे शुक्रवार 18 फेब्रुवारी रात्री 10.25 वाजता निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज शनिवार दुपारी 1 वाजता दरम्यान शहरातील कब्रिस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फहीम शेख मागील अनेक वर्षांपासून नांदेपेरा रोडवरील तिरुपती अपार्टमेंटमध्ये राहत होते. एक वर्षांपूर्वी लक्ष्मीनगरमध्ये बांधलेल्या नवीन घरात ते सहकुटुंब राहायला गेले होते. अत्यंत मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे फहीम शेख यांना अचानक किडनीचा आजार उद्भवला. अनेक ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री त्यांची तब्येत खालावली आणि ह्र्दयविकाराचा झटका आला. यात त्यांचे निधन झाले. फहीम शेख यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा तसेच मोठ्या संख्येने आप्त परिवार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post

Comments are closed.