गणपतराव बापूराव राऊत यांचे निधन
पत्रकार भास्कर राऊत यांना पितृशोक, दुपारी एक वाजता चोपण येथे अंत्यसंस्कार
सुरेश पाचभाई, मारेगाव: गणपतराव बापूराव राऊत रा. चोपण (मार्डी) यांचे मारेगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. तालुक्यातील पत्रकार भास्कर राऊत यांचे ते वडील होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. चोपण येथून ते सेवानिवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते मारेगाव येथे त्यांचा मुलगा भास्कर राऊत यांच्या घरी आले होते. आज दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंड असा बराचसा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता चोपण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Comments are closed.