वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

अॅड. निलेश चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम; सामाजिक उपक्रमातून मदतीचा संदेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी बांधवांसमोरील संकट लक्षात घेऊन अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी ₹21,000 मुख्यमंत्री सहायता निधीस मदत म्हणून जमा केली.

संकटाच्या काळात गरजू नागरिक आणि शेतकरी बांधवांना मदत मिळावी, या भावनेतून हा उपक्रम करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च होणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी देत अॅड. चौधरी यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

“वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस व्हावा, या भावनेतून ही मदत केली आहे. महाराष्ट्रातील संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी व्यक्त केली.

संकटाच्या काळात उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत केलेल्या या उपक्रमातून ‘आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजासोबत वाटावा’ हा संदेश देण्यात आला.

Comments are closed.