रेशनच्या धान्याबाबत कार्डधारकांमध्ये विविध संभ्रम

केवळ कार्ड धारकांनाच मिळणार मोफत तांदूळ

0

जब्बार चीनी, वणीः अद्याप रेशनचे धान्य मिळाले नसले तरी त्याबाबत विविध संभ्रम शिधापत्रिकाधारकांमध्ये दिसून येत आहे. धान्य फुकट मिळणार का? तीन महिन्यांचे एकाच वेळी मिळणार धान्य मिळणार का? 5 किलो तांदूळ फुकट मिळणार इ. बाबत विविध संभ्रम शिधापत्रिकाधारकांमध्ये दिसून येत आहे. त्यातच धान्य फुकट मिळणार असल्याचा एक फॉर्म व्हायरल झाल्याने त्यात गोंधळात आणखी भर पडली.

आधी राज्य सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकाच महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यातच मिळणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र निर्णयाच्या तीन दिवसानंतर शासनाने तो निर्णय रद्द केला. तसचे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसेल त्यांनाही एक फॉर्म भरून दिल्यास रेशन मिळणार अशी अफवा सोशल मीडियावरून पसरली होती. शिवाय सरकारने शिधापत्रिका धारकांना मोफत 5 किलो तांदूळ देणार असल्याचेही जाहीर केले आहे. पण ते कधी मिळणार याबाबतही संभ्रम आहे.

केवळ रेशनकार्ड धारकांनाच मिळणार रेशन – पडोले

रेशनवरील धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड असणे ही प्राथमिक अट आहे. हे कार्ड नसेल तर धान्य मिळणार नाही. शिवाय तीन महिन्याचे धान्य ही एकाच वेळी मिळणार नाही. आता फक्त एप्रील महीन्याचे धान्य मिळेल. जे कार्डधारक हे धान्य उचलतील त्यांनाच रेशन उचलल्याच्या पुढील आठवड्यात 5 किलो तांदुळ मोफत मिळणार. कार्डधारक नसलेल्यांना 5 किलो तांदूळ मिळणार नाही.
– ओंकार पडोले, अन्न व नागरी पुरवठा अन्न निरीक्षक

कार्ड नसणा-यांनाही मोफत धान्य मिळणार ही अफवा

शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना रेशन दुकानावरून धान्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना एक फॉर्म भरुन द्यावा, असे आवाहन करणारा एक संदेश आणि फॉर्मचा नमुना समाज माध्यमावर फिरत होता. हा फॉर्म भरून दिल्यास ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांनाही रेशन दुकानावर धान्य मिळेल, असा दावा यात केला गेला होता. परंतु असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे ही एक अफवा असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.