सरकारचा अल्टीमेटम झुगारला. सोमवारी एकही नवीन कर्मचारी रुजू नाही

आगार प्रमुख धुळफेक करीत असल्याचा संपक-यांचा आरोप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या सव्वा महिन्यांपासून एस टी महामंडळ कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. सरकारने त्यांना वेतनवाढीसह काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य नसल्याने 80 टक्के पेक्षा अधिक कर्मचारी अद्यापही संपावरच आहे. संपकरी कर्मचा-यांना सरकारतर्फे सोमवारपर्यंत रुजू होण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. सोमवारी सुजू झाल्यास निलंबन, बदली रद्द करण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र वणी डेपोत सोमवारी एकही नवीन कर्मचारी रुजू झाला नाही. दरम्यान वंचित बहुजन आघाडीतर्फे गाड्या सुरू करायच्या असल्यास लांब पल्ल्याच्या सोडाव्यात अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

दिनांक 6 डिसेंबर पासून बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या त्यांच्या संख्येत वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात होती, मात्र बसवर दगडफेकीची घटना झाली. त्यामुळे लांब मध्यम पल्ल्याच्या गाडा थांबवून जवळच्या पल्ल्याच्या गाडी सोडण्यावर आगाराने भर दिला आहे. सध्या दिवसाला 7 बस पांढरकवडा, मुकुडबन, पाटण या भागात जात आहे. मात्र ज्या भागात कमी प्रवासी आहे. त्याच भागात बस सोडून आगार प्रवाशांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप संपकरी कर्मचा-यांनी केला आहे.

संपकरी कर्मचा-यांना 20 डिसेंबरची आतुरता?
पुढच्या आठवड्यात 20 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सदर करण्याची शक्यता आहे. दरम्यान या दिवशी विलिनीकरणाचा निर्णय होणार असल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी रुजू होण्यास टाळत असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे न्यायालयाचा निर्णय़ विरोधात गेला तर काय करायचे? हा देखील प्रश्न संपक-यांसमोर आहे.

दगडफेकीची आगार प्रमुखाने घेतली धास्ती?
6 डिसेंबरनंतर बस सुरू झाल्यानंतर दुस-याच दिवशी वणी-यवतमाळ बसवर दगडफेक झाली. त्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर येथे देखील संप सुरू असल्याने तिथे चालक वाहकास तिथल्या संपकरी कर्मचा-यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. त्यामुळेच मध्यम पल्ल्याच्या बस ऐवजी पाटण, मुकुटबन, पांढरकवडा इत्यादी जवळच्याच्या पल्ल्याच्या बस सोडल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या एक हप्त्यापासून कर्मचारीऱ्यांच्या संख्येत कोणतीच वाढ झाली नाही. त्यामुळे 7 बस फेऱ्यांच्या पलीकडे एकही नवीन फेरी वाढली नाही. वणी आगारात एकूण बस संख्या 40 आहेत. तर एकूण कर्मचारी 228 आहेत. यातील 24 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात चालक, वाहक, तंत्रज्ञ इत्यादींचा समावेश आहे. आणखी चालक-वाहक सुरू झाल्यावर बस फे-यांची संख्या वाढणार अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली. संपामुळे वणी आगाराचे रोजचे 5 लाखांचे नुकसान होत आहे.

हे देखील वाचा:

निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह गावालगत शेतात आढळला

वणी-मुकुटबन रोडवर पिकअपची ऑटोला भीषण धडक

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.