वणी-मुकुटबन रोडवर पिकअपची ऑटोला भीषण धडक

7 जण जखमी, रात्री 8 वाजताच्या दरम्यानची घटना

जितेंद्र कोठारी, वणीः कायर कडून वणीच्या दिशेने येणा-या एका ऑटोला घोन्सा फाट्याजवळ एका पिक अप वाहनाने जबर धडक दिली. आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात ऑटोतील 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून यातील 3 लोक गंभीर असल्याचीही माहिती आहे. गंभीर जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की वेगाव येथील काही लोक कायर जवळील पिंपरी येथे स्वयंपाकासाठी गेले होते. स्वयंपाक संपवून रात्री ते ऑटोने गावी परत निघाले होते. दरम्यान रात्री एक पिक अप वाहन वणीहून तेजापूर येथे जात होते. 8 वाजताच्या सुमारास घोन्सा फाट्याजवळ पिक वाहनाने पिंपरीरहून निघालेल्या ऑटोला जबर धडक दिली. यात सात जण जखमी झाले.

कल्पना धोबे, सुरेश ठावरी, गंगूबाई सुरेश ठावरी, मयुर लक्ष्मण ठावरी, तुळसाबाई पोटे, हर्षल गायकवाड असे जखमींचे नाव आहे. यातील तीन लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात होताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह गावालगत शेतात आढळला

Comments are closed.