ट्रक व स्कुटीची धडक, तरुण तरुणीचा जागीच मृत्यू

शनिवारी रात्री मारेगाव येथे भीषण अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव शहरा पासून काही अंतरावर असलेल्या वणी-यवतमाळ रोडवरील तुळशीराम बार समोर ट्रक आणि स्कुटी यांचेत समोरासमोर झालेल्या अपघातात स्कुटीवरील मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार, गौरव बापूराव आत्राम वय 23 वर्षे रा. गौराळा व कु. नोमेश्वरी राजेंद्र हनुमंते वय वय 17 रा. बोपापूर (कायर) वर्षे हे वणी वरुन स्कुटीने (MH 29 BW 7575) मारेगावकडे येत होते. रात्री साडेआठच्या सुमारास तुळशीराम बारसमोर एका आयशर ट्रक (MH 04 BG 3805) व स्कूटीत समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जबर होती की स्कूटी ट्रकच्या चाकाखाली अडकून काही मीटरपर्यंत ओढली गेली.

अपघातानंतर महामार्गावरील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलगा 10 वी झालेला तर मुलगी मारेगाव येथे 12 वीला होती व मारेगाव येथेच राहायची, अशी माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. 

Comments are closed.