रविवारीही सबमीट करता येणार उमेदवारांना नामनिर्देशन पत्र, आज 4 अर्ज

पक्षाच्या तिकीटासाठी इच्छुक असणा-या उमेदवारांनाही 5 सूचक जोडून भरता येणार फॉर्म

बहुगुणी डेस्क, वणी: नामनिर्देशन करण्याची ऑनलाईन प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे. तर 17 नोव्हेंबर पर्यंत अर्जाची हार्डकॉपी सादर करावी लागणार आहे. आज शनिवारी चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. यात एक शिवसेना (उबाठा) गटाची उमेदवार आहे. तर तीन अपक्ष उमेदवार आहेत. सोमवारी एकाच वेळी उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून उमेदवारांना उद्या रविवारी देखील दु. 3 वाजेपर्यत फॉर्म सबमिट करता येणार आहे. तसेच अर्ज तपासणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी एकाच वेळी होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

 

पक्षाच्या तिकीटासाठी इच्छुकांना भरता येणार फॉर्म
सध्या अधिकाधिक उमेदवार पक्षाच्या तिकीटाची प्रतीक्षा करीत आहे. पक्षातर्फे फॉर्म भरणा-या उमेदवारांना एक सूचक पाहिजे आहे. तर अपक्षांना पाच सूचक पाहिजे आहेत. मात्र पक्षातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांना 5 सूचक जोडून पक्षातर्फे आधीच फॉर्म भरता येणार आहे. तर त्यांना 17 तारखेला दु. 3 वाजेच्या आत एबी फॉर्म जोडावा लागणार आहे. जर त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडला तर तो पक्षाचा अधिकृत फॉर्म मानला जाईल. जर त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही तर त्यांचा फॉर्म हा बाद न होता अपक्ष म्हणून गृहित धरला जाईल. त्यामुळे पक्षा तर्फे इच्छुक असणा-या उमेदवारांनाही उद्या फॉर्म भरता येणार आहे. याबाबत माहिती हवी असल्यास त्यांना मदत कक्षात याबाबत मदत मिळू शकते. 

मदत कक्ष राहणार उद्या संध्याकाळ पर्यंत
दर निवडणुकीत अनेक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र त्रुटी किंवा चुकीच्या पद्धतीने भरल्याने अवैध ठरवले जाते. त्यामुळे अर्ज सबमीट करण्याआधी आता उमेदवारांना अर्ज तपासण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात याबाबत मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा मदत कक्ष उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार. तसेच अधिक उमेदवार आल्यास त्यानंतर देखील कक्ष सुरु राहणार, मदत कक्षाला लाभ घेण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आता पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा तर्फे 1 उमेदवारांनी फॉर्म सबमीट केला आहे. तर शुक्रवारी चार उमेदवारांनी फॉर्म सबमिट केले. यात प्रभाग 2 अ मधून उबाठा गटाच्या ज्योत्स्ना बालाजी धोटे, प्रभाग क्र. 1 ब मधून अपक्ष उमेदवार प्रकाश जनार्धन पिंपळकर, प्रभाग 4 अ मधून अपक्ष उमेदवार माधूरी किरण तेलतुंबडे व प्रभाग 13 ब मधून निखिल धर्मा ढुरके यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे.

Comments are closed.