विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ येथील विद्युत विभागाशी संबंधीत अधिकारी लाच घेताना सापडल्याची माहिती आहे. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास या लाचखोर अधिका-याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सध्या चौकशी व पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, वणीतील मुख्य मार्केटमध्ये एका व्हिडीओ गेमचालकाला विजेच्या कनेक्शनबाबत एनओसीची गरज होती. काही दिवसांआधी संबंधित विभागातील यवतमाळ येथील एक अधिकारी निरीक्षणासाठी सदर दुकानात आला होता. तिथे त्याने दुकान मालकाला एनओसीसाठी पैशाची मागणी केली होती. त्यावर मालकाने पुढील दिवस देऊन अधिका-याला बोलावले.
दरम्यान दुकान मालकाने याची माहिती लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. ठरलेल्या दिवशी म्हणजे आज गुरुवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी सदर अधिकारी हा स्थानिक दोन कर्मचायांना घेऊन दुकानात गेला. तिथे त्याने लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
सध्या या प्रकरणी चौकशी व कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे. अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट करण्यात येईल.
हे देखील वाचा:
थरार: पतीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला
आता 3D मध्ये आनंद घेता येणार अवतार 2 सिनेमाचा, रोज 2 शो 3D मध्ये
Comments are closed.