बहुगुणी डेस्क, वणीः जुनी पेंशन हक्क या मागणीसह सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
संपकर्त्यांनी विविध मागण्या केल्यात. मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपये देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. पण या घोषणेवर प्रत्यक्ष कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे संपकर्त्यांचे म्हणणे होते. संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मागे या विषयावर चर्चा केली. अंशदान पेंशन योजना डी.सी.पी.एस.मधील तृटींबाबत समिती नेमण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावर संघटनेचे समाधान न झाल्याने सात, आठ आणि नऊ ऑगस्ट असा तीन दिवसीय संप पुकारला आहे.
या संपात वणीतील सरमोकदम, ब्राम्हणे, नगराळे, करमरकर, धानफुले, लिडबिडे, चामाटे, त्रिवेदी, बागळदे व अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.