कोविड केंद्रासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये

खनिज विकास निधीतून 5 कोटींच्या निधीची देखील मागणी

0

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी विधानसभा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन अशा विविध बाबीची व्यवस्था कमी पडत असल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 50 लाख, झरी तालुक्यासाठी 25 लाख व मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 25 लाख असे एकूण एक कोटी रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिली आहे. या संबंधीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

यासह ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर इमारती मध्ये 80 खाटांचे डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याकरिता 80 बेड, आक्सिजन, वेंटीलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन, स्ट्रेचर, तसेच आक्सिजन व वेंटीलेटर ने सज्ज 2 रुग्णवाहिका आदी महत्वपुर्ण उपकरणाकरीता तातडीने जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा अशी मागणी आ. बोदकुरवार यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

कोरोना रुग्णासाठी सुसज्ज सुविधा पुर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर मध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड, रेमडेसीवर इंजेक्शन, स्ट्रेचर या आवश्यक बाबी वणी मारेगाव, झरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीने एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वणीकरांच्या सेवेत यावेळी सुसज्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेले बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी, ऐबुलंन्स व आवश्यक डॉक्टर व नर्सेस इत्यादी व्यवस्था आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा:

50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.